प्रतिनिधी / कसबा बीड
बहिरेश्वर तालुका करवीर येथे १ जुलै कृषी दिनापासून संजीवनी कृषी सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर या संकल्पनेतून शेतकऱ्यांना शेती करत असताना येणाऱ्या अडचणी, पिकावर होणारे नवनवीन रोग, ऊस तंत्रज्ञान, हुमणी नियंत्रण, माती परीक्षण, भात पिकावरील रोग व नियत्रंण आदी विषयावर विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉक्टर अशोक पिसाळ यांनी आलेल्या शेतकऱ्यांना व प्रत्यक्ष शेतावरती जाऊन मोलाचे मार्गदर्शन केले.
कृषी विभाग व ग्रामपंचायत बहिरेश्वर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कृषी सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच साऊताई बचाटे होत्या. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल बहिरेश्वरच्या प्रांगणात व गायरानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी दीपक देशमुख, मंडल कृषी अधिकारी तानाजी साठे, कृषी पर्यवेक्षक एल एन चौगुले, सर्व कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आर आर भगत, ग्रामपंचायत सर्व सदस्य,तसेच रामचंद्र दिंडे, धुळाप्पा दिंडे, जनार्दन बचाटे आदि शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleकोरोचीत एकाचा अहवाल निगेटिव्ह, आठ जण विलगीकरण केंद्रात दाखल
Next Article वैराग येथे खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट









