प्रतिनिधी / सांगरूळ
कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे मोठे आहे. सहकारामुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात सहकाराचे योगदान मोठे असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार रुजवणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष जी.डी. पाटील यांनी केले.
बहिरेश्वर (ता. करवीर ) येथील ग्रामपंचायतीच्या नवीन गाळ्यामध्ये शेतकरी संघाच्या नवीन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना जी डी पाटील म्हणाले, ग्रामीण भागात लहान मोठ्या सहकारी संस्था उभा करून ग्रामीण भागातील लोकांच्या हाताला काम दिल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला असून ग्रामीण भागात सहकार रुजवून तो वाढवण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. त्यासाठी आता तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. शेतकरी संघाने येथे नवीन शाखा सुरू करून शेतकरी संघाच्या सर्व वस्तु व रासायनिक खत उपलब्ध करुन दिले असून येथील जनतेने या शाखेतून आपले व्यवहार करावे असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, सरपंच साऊबाई बचाटे, उपसरपंच सुवर्णा दिंडे, सिताराम पाटील, रघुनाथ वरुटे, शिवाजी चव्हाण, तानाजी गोदडे, चंद्रकांत दिंडे, ग्रामपंचायतीचे सदस्य, कोठेश्वर विकास सेवा संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









