सांगरूळ / प्रतिनिधी :
कोगे बहिरेश्वर दरम्यान बंधारा हा पाणी अडवणूकीसाठी बांधणेत आला होता. त्याचा वापर हा निव्वळ पाणी अडवण्यासाठी आहे परंतु अवजड वाहतूक होत असलेने बंधारा आज शेवटची घटका मोजत आहे. पाटबंधारे कार्यकारी अभियंता रोहीत बांधिवडेकर, उपअभियंता माने, शाखा अभियंता आंबोळे, जि. प. सदस्य सूभाष सातपूते आदींनी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार पी. एन. पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ निधी उपलब्ध करावा अशा आशयाच पत्र पाटबंधारे विभागाला पाठवले त्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने तात्काळ दुरुस्तीसाठी १२ लाख रुपये निधी उपलब्ध करून देत ताबडतोब काम करावे अशा सूचना ठेकेदारांना दिल्या. ६ जून पर्यंत काम पूर्ण करू अशी ग्वाही ठेकेदार सूर्यकांत दिंडे यांनी दिली. शिवाय संपूर्णं बंधारा दूरूस्तीसाठी ४७ लाख रुपये निधीचा प्रस्ताव (मंजूरी )अंतिम टप्यात असलेच कार्यकारी अभियंता रोहीत बांधिवडेकर यांनी सांगितले.
याप्रसंगी ग्रा. प. सदस्य तानाजी गोदडे, ग्रा. प. सदस्य उत्तम चव्हाण, माजी उपसरपंच अजित पाटील, धनाजी बचाटे, विनायक साठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.