सांगरुळ / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील बहिरेश्वर ग्रामपंचायतीस आर आर पाटील आबा सुंदर गाव पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.आर आर पाटील आबा यांच्या ६ व्या स्मृती दिनानिमित जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेवतीने आर आर पाटील आबा सुंदर गाव स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा स्पर्धचा बक्षीस विरतण समारंभ शाहू सांस्कृतिक भवन जि प कोल्हापूर येथे संपन्न झाला.
यावेळी करवीर तालूका स्तरातून बहिरेश्वर गावाला राज्याचे आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे हस्ते पूरस्कार देणेत आला. प्रशस्ती पत्र व दहा लाख असे प्रोत्साहनपर बक्षीस देणेत आले.
यावेळी जि प अध्यक्ष बजरंग पाटील,शिक्षण समिती सभापती मा प्रविण यादव , महिला व बालकल्याण समिती सभापती मा पद्माराणी पाटील, जि प सदस्य सूभाष सातपूते. कुंभी माजी संचालक सिताराम पाटील, भगवान दिंडे, आनंदा दिंडे, शिवाजी चव्हाण, पांडूरंग दिंडे, सरपंच यूवराज दिंडे, उपसरपंच सुवर्णा दिंडे यांच्यासह.ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी राजू भगत, तंटामूक्त अध्यक्ष मारूती दिंडे आदी उपस्थित होते.