प्रतिनिधी / सांगरूळ
बहिरेश्वर तालुका करवीर येथील लोकनियुक्त सरपंच साऊबाई नारायण बचाटे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
सरपंच साऊबाई बचाटे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात, हे कारण दाखवत ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुवर्णा दिंडे सदस्य युवराज दिंडे, तानाजी गोधडे, उत्तम चव्हाण, कृष्णात सुतार, रंजना संभाजी दिंडे, रंजना रामचंद्र दिंडे, मीना गोसावी, योगिता गोसावी, शालाबाई कांबळे यांनी नवीन शासन निर्णयाच्या आधारावर करवीर तहसीलदार कार्यालयात तक्रार करत अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्याबाबत ग्रामपंचायत सदस्यांची बैठक आज करवीरच्या तहसीलदार शितल भामरे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन सरपंच साऊबाई बचाटे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव दहा विरुद्ध एक मताने मंजूर करण्यात आला. यावेळी तलाठी पुरुषोत्तम ठाकूर उपस्थित होते.
जुलै २०१८ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते सिताराम पाटील, सूर्यकांत दिंडे, भगवानराव दिंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने लोकनियुक्त सरपंच पदासह दहा जागा जिंकल्या होत्या. यावेळी लोकनियुक्त सरपंच म्हणून साऊबाई बचाटे यांची निवड झाली होती.