वारणानगर / प्रतिनिधी
बाबू पार्क, बहिरेवाडी ता. पन्हाळा येथे रहाणाऱ्या ऐश्वर्या शिवाजी पोवार वय २२ मुळगांव मोहरे ता. पन्हाळा हिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
ऐश्वर्याचे चुलते बाबुराव श्रीपती पोवार रा.बाबु पार्क, बहीरेवाडी यांनी कोडोली पोलीसात याबाबत वर्दी नोंदवली आसून आत्महत्येचे कारण स्पष्ट समजू शकलेल नाही. मात्र अवघ्या बावीस वर्षीय तरुणी बाबत झालेल्या या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. बुधवार दि. १६ रोजी सकाळी सव्वा आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी पोलीस दाखल होत पुढील तपास करत आहेत.या मध्ये सहा. पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यानी भेट देवून पाहणी केली पो.ना. सुतार तपास करीत आहेत.
Previous Articleलहान व्यवसायांसाठी फेसबुकचे 32 कोटींचे अनुदान
Next Article सांगली : कोरोनाने गाठला 25 हजाराचा आकडा









