प्रतिनिधी / बेंगळूर
कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात तीन वर्षाच्या बालकासह बहिण-भावाचा मृत्यू झाला आहे. रायचूर जिल्हय़ाच्या नागराळ क्रॉसजवळ (ता. लिंगसगूर) रविवारी ही हृदयद्रावक घटना घडली. बसवराज (वय 32), पल्लवी (वय 23) आणि संगमेश (वय 3) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. ते लिंगसगूर तालुक्याच्या गुंतगोळ येथील रहिवासी आहेत. बसवराज आणि पल्लवी हे चुलत भाऊ-बहिण आहेत. ते बहिणीच्या घरी जाऊन परतत असताना त्यांच्या दुचाकीची कारला धडक बसली. या अपघातात तिघेही जागीच ठार झाले. दुचाकीवर बसवराजच्या बहिणीचा तीन वर्षांचा मुलगाही होता. मुदगल पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.









