विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
आता शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसने ये-जा करावी लागत आहे. मागील वषीच्या पासची मुदत 25 सप्टेंबर रोजी संपली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तिकीट काढून ये-जा करावी लागत आहे. तेव्हा मोफत पास द्यावा, अशी मागणी ऑल इंडिया डेमॉक्रॅटिक स्टुडंट ऑर्गनायझेशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मागील वषी कोरोनामुळे बस बंद होत्या. याचबरोबर महाविद्यालये आणि शाळा देखील बंद असल्याने विद्यार्थ्यांनी पैसे भरून घेतलेले बसपास कुचकामी ठरले आहेत. विद्यार्थ्यांनी भरलेली रक्कम वाया गेली आहे. तेव्हा यावषी विद्यार्थ्यांना मोफत पास द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. हवे तर मागील वर्षीच्या बसपासची मुदत वाढवून द्या, अशीदेखील मागणी करण्यात आली.
परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांना याबाबत तशी सूचना करावी आणि विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी एआयडीएसओचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









