बेंगळूर/प्रतिनिधी
बी.एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान, मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी. किशन रेड्डी यांनी मंगळवारी विधिमंडळाची बैठक घेत नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. नवीन मुख्यमंत्री म्हणून सर्व आमदारांनी एकमताने बसवराज बोम्माई यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. दरम्यान, आज बोम्माई मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यापूर्वी राजभवनात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
बेंगळूर ट्रॅफिक पोलिसांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लोकांना राजभवनाचा मार्ग टाळण्याचा सल्ला दिला आहे कारण समारंभाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ शकते आणि पर्यायी मार्ग शोधणे कठीण होऊ शकते.
दरम्यान शपथविधी होण्यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री-नियुक्त बसवराज बोम्माई यांनी केंद्रीय भाजप निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांची भेट घेतली.









