सांबरा / वार्ताहर
बसवण कुडची शिवारात विद्युत मोटारी चोरण्याच्या प्रकारात वाढ झाली असून रविवारी रात्री तीन विद्युत मोटारी चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या सहा महिन्यातील चोरीची ही दुसरी घटना आहे. याआधी पाच विद्युत मोटारींची चोरी करण्यात आली होती. आता शांतू पाटील यांच्या दोन विद्युत मोटारी व अनिल (पप्पू) घसारी यांची एक विद्युत मोटार चोरटय़ांनी चोरल्या आहेत. सध्या उसाची लावण करणे तसेच भाजीपाल्यासाठी पाण्याची गरज असताना विद्युत मोटारी चोरण्यात आल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सात महिन्यापूर्वी चोरीची घटना घडल्यानंतर माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली होती. आता परत चोरीची घटना घडल्यानंतर शेतकऱयांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरटय़ांना गजाआड करावे, अशी शेतकरीवर्गातून मागणी होत आहे..









