ग्रा. पं. च्या नूतन सदस्यांचा सत्कार
वार्ताहर / सांबरा
बसरीकट्टी येथे विश्वजित क्रिकेट क्लबच्या सौजन्याने आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या चषकाचे अनावरण व नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी सिव्हिल इंजिनिअर यल्लाप्पा बैलवाड होते.
प्रारंभी श्री महालक्ष्मी हायस्कूलमधील मुलींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लक्ष्मण जैनोजी यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. सचिन चौगुले यांनी कार्यक्रमाचा उद्देश व खेळाचे महत्त्व पटवून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन यल्लाप्पा बैलवाड यांनी केले. चषकाचे अनावरण नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांनी केले. ग्रा. पं. चे नूतन सदस्य दिलीप कोंडुस्कोप, सागर शेरेकर, तानाजी चौगुले, प्रशांत कल्लाणाचे, लक्ष्मीबाई चौगुले, गीता कोलकार यांचा सत्कार ग्रामस्थ व विश्वजित क्रिकेट क्लबच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. स्पर्धेसाठी चषक दिल्याबद्दल किरण कोंडुस्कोप यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गावातील तरुण वर्ग, महिला व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक बी. बी. कोंडसकोप यांनी केले. शिक्षक रमेश कुरंगी यांनी आभार मानले.









