ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपाने 10 छोटय़ा पक्षांशी युती करण्याची घोषणा केली आहे. बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली.
मिश्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मायावतींच्या विकसनशील विचारांनी प्रेरित होऊन 10 राजकीय पक्षांनी बसपाला पाठिंबा दिला असून, पुढे जाऊन ‘सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’ या विचारसरणीसह काम करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
इंडिया जनशक्ती पार्टी, पच्चासी परिवर्तन समाज पार्टी, विश्व शांती पार्टी, संयुक्त जनादेश पार्टी, आदर्श संग्राम पार्टी, अखंड विकास भारत पार्टी, सर्वजन आवाज पार्टी, आधी अबादी पार्टी, जागरुक जनता पार्टी आणि सर्वजन सेवा पार्टीसोबत बसपा युती करणार आहे.