शासनाकडून कवडी तरी मिळेल या आशेने बळीराजा स्वतःच करतोय पंचनामा
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाने अगोदरच बळीराजावर सकंट आले आहे. तरीही सगळ्य़ांचा तारणहार बळीराजा खचून न जाता आपल्या जवळच्या शेतीत कष्ट करत राहिला. हाताला आलेल्या पिकांची दैना तीन दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने केली आहे. ज्वारीची कणस ताटावरच उगवली आहेत. भुईमूगाच्या शेंगा जमिनीत कुजून गेल्या आहेत.
भाताचे तर वाळवाणच झाले आहे. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनामे करण्यासाठी एवढ्य़ा भयंकर अटी आहेत. त्या अटी पूर्ण करता करता सुगीच्या दिवसात वाया गेलेले पिक काढण्याचे काम सोडून पंचनामे करण्याची लगबग जिल्ह्यात सुरु आहे. पंचनामे करण्यासाठीही शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन हवा आहे. फोटो कॉपी काढली पाहिजे, त्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत होती. त्यातच आज शेवटचा दिवस पंचनाम्याचा होता.









