प्रतिनिधी / मिरज
मिरजेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करून आरोपीची फटके मारत शहरातील प्रमुख मार्गावरून धिंड काढावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
महिला आघाडीच्या अॅड. स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मिरजेत चिकन सेंटर चालविणाऱ्या फय्याज कोकणे या तरुणाने ओळखीच्या कुटुंबातील बारा वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लिल चित्रफित दाखवून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे. बलात्कार पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपीला कडक शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.








