बेळगाव : बलराम स्पोर्ट्स क्लब बेळगाव आयोजित राजू काणकोणकर पुरस्कृत 29 वी श्री बलराम स्पोर्ट्स क्लब मिनी मॅरेथॉन 26 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या मॅरेथॉनला सायंकाळी 4 वा. बसवेश्वर सर्कल गोवावेस (मनपा जलतरण तलाव) येथून प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा 72 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सलग 29 व्या वर्षी ही स्पर्धा भरविली जात आहे. राष्ट्रीय एकात्मता, शांतता, जातीय सलोखा, संदेशाच्या प्रसारार्थ ही स्पर्धा घेण्यात येते. गेली 28 वर्षे या स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आला आहे. धनराज गवळी व त्यांच्या सहकाऱयांनी स्पर्धेत खंड न पडण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. या स्पर्धेचे ठिकाण वारंवार बदलण्यात आले तरीही त्याचे आयोजन करण्यात येते. यावषी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या मुला-मुलींचा स्पर्धा कोविड महामारीच्या कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. तरी पालकांनी याची नोंद घ्यावी.
यावेळी सदर स्पर्धा दोन गटात होणार आहे. पुरूष व महिलागट तसेच 8 वी ते 10 वी गटात होणार आहे. पुरूष व महिला गटाची शर्यत बसवेश्वर गार्डनपासून सुरूवात होऊन रेल्वे ओव्हरब्रिज, गोगटे सर्कल, काँग्रेस रोड, पहिले रेल्वे गेट, शुक्रवार पेठ, मिलेनियम गार्डन रोड ते बसवेश्वर सर्कल येथे समाप्त होईल. 8 वी ते 10 वी गटाची शर्यत बसवेश्वर सर्कलपासून सुरूवात होऊन रेल्वे ओव्हरब्रिज, मिलिटरी महादेव मंदिर व त्याच मार्गाने बसवेश्वर गार्डन येथे सांगता होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी या स्पर्धेत मोठय़ा संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ऍड. धनराज गवळी, ऍड. श्रीकांत पवार, रोहन गवळी, सुभाष नाईक यांच्याशी संपर्क साधावा.









