वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा नौकानयनपटू बलराज पनवारने येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट निश्चित केले आहे. या स्पर्धेत कोटा पद्धतीनुसार नौकानयन (रोईंग) या क्रीडा प्रकारात स्थान मिळविणारा बलराज पनवाल हा भारताच पहिला नौकानयनपटू आहे.
दक्षिण कोरियातील चुंगजू येथे रविवारी झालेल्या 2024 च्या विश्व आशियाई आणि ओसेनियन ऑलिम्पिक तसेच पॅरा ऑलिम्पिक पात्र फेरीच्या रेगाटा स्पर्धेतमध्ये बलराज पनवालने पुरूषांच्या सिंगल स्कल या क्रीडा प्रकारात तिसरे स्थान मिळविले. 25 वर्षीय बलराज पनवाल हा भारतीय सेनेमध्ये सेवेसाठी यापूर्वी दाखल झाला आहे. चीनमध्ये गेल्या वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बलराज पनवालचे या क्रीडा प्रकारातील कांस्यपदक थोडक्यात हुकले होते. दक्षिण कोरियातील स्पर्धेमध्ये बलराज पनवालने 2000 मी. पुरूषांच्या सिंगल स्कूल प्रकारात 7 मिनिटे 0.1.27 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान मिळविले. पुरूषांच्या सिंगल स्कल प्रकारात आघाडीचे पाच स्पर्धक पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. मात्र पुरूषांच्या लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला प्रवेशाची संधी मिळाली होती. पण यावेळी ते या क्रीडा प्रकारात पात्र ठरु शकले नाही. आता 26 जुलैपासून सुरु होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रोईंग या क्रीडा प्रकारात भारतातर्फे एकमेव स्पर्धक बलराज पनवार सहभागी होईल.









