चंदीगड
भारताचे माजी ऑलिंपिक सुवर्णपदक हॉकीपटू आणि कर्णधार बलबीर सिंग सिनियर यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या कुटूंबियाने सांगितले. त्यांना व्हटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.
96 वर्षीय बलबीर सिंग सिनियर यांना श्वसनाचा त्रास होवू लागल्याने आठ दिवसापूर्वी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या जानेवारीत त्यांना न्यूमोनियाची बाधा झाल्याने सुमारे तीन महिने त्यांना रूग्णालयात राहावे लागले होते. चार दिवसापूवीं त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली होती. 1952 च्या हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेत पुरूष हॉकीचे सुवर्णपदक मिळविणाऱया भारतीय हॉकी संघात बलबीर सिंग सिनियर यांची कामगिरी दर्जेदार झाली होती. हॉलंडविरूद्धच्या अंतिम सामन्यात त्यानी पाच गोल नोंदविले होते. 1957 साली भारत शासनातर्फे बलबीर सिंग सिनियर यांचा पद्मश्री पुररस्कार देवून गौरव करण्यात आला होता. 1975 साली विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकणाऱया भारतीय हॉकी संघाचे ते व्यवस्थापक होते.








