ऑनलाईन टीम / मुंबई
बर्गर किंग इंडियाने जून 2021 ला संपलेल्या तिमाहीत 44.35 कोटी रुपयांचा तोटा अनुभवला आहे. याआधीच्या म्हणजेच वर्षापूर्वी समान कालावधीत 80.45 कोटी रुपये तोटा कंपनीला झाला आहे. त्यामुळे मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा तोटय़ाच्या प्रमाणात 55 टक्के इतकी कपात दिसली आहे. कंपनीने दरम्यानच्या कालावधीत 150 कोटी रुपयांची विक्री केली असून मागच्या मार्च तिमाहीपेक्षा विक्रीत 25 टक्के घट दिसली आहे. कोरोनामुळे कंपनीच्या व्यवसायावर मोठा परिणाम दिसला.









