मुंबई
हॉटेल व खाद्य क्षेत्रात कार्यरत कंपनी बर्गर किंग इंडिया लवकरच आपला आयपीओ सादर करणार आहे. सदरचा कंपनीचा आयपीओ पुढील महिन्यात 2 तारखेला भांडवली बाजारात दाखल केला जाणार असल्याचे समजते. 59 ते 60 रुपये प्रति समभाग असा दर असणार आहे. समभाग विक्री 4 डिसेंबरला संपुष्टात येणार असून बर्गर किंग कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 810 कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगण्यात येते. 450 कोटी रुपयांचे 7.5 कोटी समभाग नव्याने ऑफर केले जाणार आहेत. सप्टेंबर 2020 च्या ताज्या आकडेवारीनुसार कंपनीची 261 रेस्टॉरंटस् आहेत.









