वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची चाचणी करण्यात आली तेव्हा ही बाब स्पष्ट झाली. मात्र, त्यांना फारसा त्रास होत नसून त्यांची प्रकृती चांगली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. त्यांच्या पत्नी मिचेल यांची चाचणी मात्र नकारात्मक आली आहे. बराक ओबामा यांनी ट्विटरवर ही माहिती देताना आपला घसा दुखत असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबामांना लवकर बरे व्हाल असा संदेश पाठविला आहे. अमेरिकेत आता कोरोना आटोक्यात येत असला तरी गेल्या आठवडय़ात प्रतिदिन सरासरी 35 हजार रुग्णांची नोंद होत होती. ओबामा यांनी अनेकांना लसीकरण करुन घेण्यासाठी प्रोत्साहित केले होते., असेही स्पष्ट करण्यात आले आहे.









