येथून जाणारी विमाने होतात दुर्घटनाग्रस्त, वैज्ञानिकांसाठी आजपर्यंत न सुटलेले कोडं
जगात अनेक धोकादायक आणि रहस्यमय जागा आहेत. पृथ्वीवर सर्वात धोकादायक आणि गूढ जागांमध्ये सर्वात पहिले नाव बरमूडा ट्राएंगल आणि अमेरिकेतील एरिया-51 चे नाव समोर येते. पण पृथ्वीवर एक असे ठिकाण आहे जे बरमूडा ट्राएंगल आणि एरिया-51 पेक्षाही धोकादायक आहे.
हे रहस्यमय ठिकाण पश्चिम अमेरिकेच्या रेनो, प्रेस्नो आणि लास व्हेगासदरम्यान स्थित आहे. या धोकादायक जागेचे नाव नेवाडा ट्राएंगल आहे. हे ठिकाण इतके धोकादायक आहे, की येथून उड्डाण करणारे विमान आजपर्यंत परतलेले नाही. मागील 60 वर्षांमध्ये या ठिकाणी 2 हजारांहून अधिक विमाने दुर्घटनाग्रस्त झाली असून यात शेकडो वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

काय आहे रहस्य?
या क्षेत्रात एखादी अदृश्य शक्ती आहे. ही शक्ती येथून जाणाऱया विमानांना स्वतःकडे खेचून घेत असल्याचे लोकांचे मानणे आहे. येथे परग्रहवासी असल्याचेही बोलले जाते. पण अद्याप या रहस्याची उकल झालेली नाही. नेवादा ट्राएंगलचे क्षेत्र अर्ध्या इंग्लंडपेक्षाही अधिक आहे. या क्षेत्रात लास व्हेगास, एरिया-51 आणि योसेमाइट नॅशनल पार्क आहे. या भागात मोठय़ा प्रमाणावर विमान दुर्घटना झाल्या आहेत.
वैज्ञानिकांचा अंदाज
या क्षेत्रातील हवेच्या दाबामुळे या दुर्घटना घडत असाव्यात असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. या भागात विमान पर्वतांवरून जात सतात, यादरम्यान अचानक वाळवंटसदृश भूमीवरील हवेचा दाब समजून येत नाही आणि यातच विमान कोसळत असावे असे तज्ञांचे म्हणण आहे.









