तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
प्रभाग क्रमांक चारमधील विविध कामांच्या बिलाबाबत अधिकाऱयांच्या बनावट सह्या करुन दीड कोटी रुपये लाटल्याप्रकरणी महापालिकेत झालेल्या अनेक चढउतारानंतर अखेर मक्तेदार सतिश सुभाष इकरल (रा. वडार गल्ली, सोलापूर) विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी महापालिका आgयक्त डॉ. दीपक तावरे यांनी दोषींवर चोवीस तासाच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक चारमध्ये एकच काम अनेकवेळा दाखवून, तसेच अधिकाऱयांच्या बनावट सह्या करून बोगस बिले उचलल्याप्रकरणी एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी आवाज उठवला होता. याचे पडसाद 18 जानेवारी रेजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतदेखील उमटले होते. खरादी यांनी दोषींची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी आयुक्त डॉ. दीपक तावरे यांच्याकडे दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. परिणामी आयुक्त डॉ. तावरे यांनी मंगळवारी आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांना संबंधितांवर 24 तासाच्या गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार धनशेट्टी यांनी बुधवारी सदर बझार पोलीस ठाण्यात संबंधित ठेकेदार सतिश सुभाष इकरल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गुह्यातील सूत्रधारांचाही शोध घेउढ
-सायली इंटरप्रायझेशचे सतिश इरकल याने अधिकाऱयांच्या बनावट सह्या करुन झालेल्या कामाची बिले 1 लाख 97 हजार 898 रुपये हडप करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी इरकल यास लवकरात लवकर अटक करण्यात येईल. तसेच या गुह्यातील सूत्रधारांचाही शोध घेतला जाईल.
-बजरंग साळुंखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सदर बझार पोलीस ठाणे,
अविनाश कामत यांचे निलंबन
-प्रभाग चारमधील एकच काम दोन वेळा दाखवणे, अधिकाऱयांच्या बनावट सह्या करून त्यासंबंधीची बिले उचलल्याबाबत झोन एकचे अवेक्षक अविनाश कामत यांचे बुधवारी आयुक्त डॉ. दीपक तावरे यांनी निलंबन केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण †िमळाले आहे. यापुढे आणखी कोणकोणते अधिकारी गळाला लागतात, हे चौकशीअंती समोर येणार आहे.









