उत्तरप्रदेशात दिल्ली पोलिसांची कारवाई
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तरप्रदेशात बनावट ‘रेमडेसिवीर’ तयार करणाऱ्या टोळीचा दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या टोळीच्या म्होरक्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
उत्तराखंडमधील हरिद्वार, रुडकी आणि कोटद्वारमधील बेकायदेशीर कारखान्यांमध्ये ही टोळी बनावट रेमडेसिवीर तयार करत होती. या टोळीकडून हे बनावट इंजेक्शन 25 हजार रुपयांना विकण्यात येत होते. पोलिसांनी आरोपींकडून 196 बनावट इंजेक्शन आणि 3000 रिकाम्या बॉटल्स जप्त केल्या आहेत. आरोपींनी आतापर्यंत 2000 हून अधिक जणांना बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.