कित्तूर येथे कारवाई, खतासह साहित्य जप्त
बेळगाव : बायोडीएपी आणि बायो युरिया या नावाने बनावट खत विक्री करणाऱया ऍग्रीकल्चर सर्व्हिस सेंटरवर धाड टाकून खतासह इतर साहित्य जप्त केले. कित्तूर येथे झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून बनावट खत विपेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कित्तूर येथील सिद्धारुढ असोसिएट ऍग्रीकल्चर सर्व्हिस सेंटर येथून बनावट खत विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानंतर कृषी अधिकाऱयांनी पोलिसांचे सहकार्य घेत या कृषी सेंटरच्या गोडावूनवरच धाड टाकली. त्या ठिकाणी बनावट खत असल्याचे उघडकीस आले. धारवाड येथून खत आणून त्यानंतर ते बायोडीएपी या नावाच्या पोत्यांमध्ये भरुन त्याची विक्री सुरू होती. या प्रकरणी मल्लय्या बसवनय्या चिकमठ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून ते हे बनावट खत विक्री करत होते. संबंधितांवर गुन्हा नोंदविला आहे.









