बार असोसिएशनतर्फे न्यायाधीशांच्या चेंबरमध्येच छोटेखानी सत्कार समारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हा न्यायालयातील अनेक न्यायाधीशांची बदली झाली आहे. कोरोनामुळे कार्यक्रमाचे आयोजन करणे अशक्मय असल्यामुळे बार असोसिएशनच्यावतीने न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जाऊन तेथेच छोटेखानी सत्कार समारंभ करण्यात आला.
दुसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश जी. नंजुडय्या, जिल्हा कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश विला दामोदर खोडे, तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश मंजाप्पा हणमंताप्पा अन्नयण्णावर, तिसरे अतिरिक्त उच्च दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश के. लक्ष्मी, मुख्य दिवाणी न्यायाधीश बसवराज तळवार, पहिले अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश समीर कोल्ली, जेएमएफसी पाचवे न्यायालयाच्या न्यायाधीश तेजस्वीनी के. एम., जेएमएफसी सातवे न्यायालयाच्या न्यायाधीश प्रीती मळवळ्ळी, दुसरे अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश सुजाता ए. बी. आणि जेएमएफसी आठवे न्यायालयाच्या न्यायाधीश भाग्यलक्ष्मी यांचा सत्कार करण्यात आला.
या सर्व न्यायाधीशांची बदली झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे. यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, ऍड. नितीन गंगाई, ऍड. कलमेश मायाण्णाचे उपस्थित होते.









