ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करत स्थानिक दहशतवाद्याला त्याच्या चार साथीदारांसह अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यांसह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मोहम्मद युनूस मीर (रा. बडगाम) असे अटक करण्यात आलेल्या स्थानिक दहशतवाद्याचे नाव आहे.
गुप्तचर यंत्रणेच्या माहितीच्या आधारे बडगाम पोलिसांनी सीआरपीएफच्या लष्कराचे 53-आरआर आणि बटालियन-43 यांच्यासह सर्च मोहीम राबवली. या सर्च मोहीमेदरम्यान लष्कर-ए-तोयबाच्या मोहम्मद मीर या दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून पिस्तूल (चीन निर्मित), एक मॅगझीन, 8 काडतुसे यांसह आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
मीर याच्या चौकशीदरम्यान बडगाम पोलिसांनी त्याच्या चार मदतनीसांनाही अटक केली. तसेच त्यांच्या ताब्यातून आक्षेपार्ह साहित्य आणि दोन ग्रेनेडसह दारूगोळाही जप्त करण्यात आला. इम्रान जहूर गनी, ओमर फारूक वानी, फैजान कय्युम गनी आणि शाहनवाझ अहमद मीर अशी या चार मदतनीसांची नावे आहेत.









