भाजीपाल्याबरोबरच रताळी भाव स्थिर : कांदा प्रतिक्विंटल 200 रुपयांनी वाढला
वार्ताहर /अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी बटाटा दरात 200 रुपयांनी घट झाली. कांदा प्रतिक्विंटल 200 रुपयांनी वाढला असून रताळय़ांचा भाव स्थिर आहे. भाजी मार्केटमध्ये भाजीपाला भाव स्थिर आहेत.
इंदूर, आग्रा या ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडला होता. यामुळे बटाटा काढणी थांबली होती. यामुळे त्यावेळी बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटा भाव वाढला होता. मात्र, आता तेथील पाऊस थांबल्याने बटाटा काढणीला जोमाने सुरुवात झाली आहे. हा बटाटा संपूर्ण देशभरातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी जात आहे. सदर बटाटा अजून कच्चा आणि कचवड आहे. बेळगाव बाजारात शनिवारी आवक वाढल्याने बटाटा भाव प्रतिक्विंटल 200 रुपयांनी कमी झाला आहे.
तालुक्मयातील रब्बी हंगामातील नवीन बटाटा सध्या काढणीला प्रारंभ झाला आहे. रताळी आवक जवळपास संपत आली आहे. मात्र, रताळय़ाला मध्यप्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी ठिकाणांहून मागणी आहे, अशी माहिती अडत व्यापारी अशोक बामणे यांनी दिली. बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याचे कारण महाराष्ट्रात कांद्याला हमीभाव मिळत आहे. तोच भाव कांद्याला नाशिक बाजारात मिळत आहे. यामुळे कांदा आवक कमी झाल्याची माहिती अडत व्यापाऱयांनी दिली.
पंधरा दिवसांपूर्वी बाजारात भाजीपाल्याचे भाव घसरले होते. मात्र, शनिवारच्या बाजारात भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे भाव टिकून आहेत, अशी माहिती भाजी व्यापारी भैरू कंग्राळकर यांनी दिली.
शनिवारी मार्केट यार्डमध्ये रताळी केवळ तीन हजार पिशव्या आवक, जवारी बटाटे पंधरा पिशव्या आवक, इंदूरहून 20 ट्रक, आग्राहून दोन ट्रक, तळेगावहून दोन ट्रक, कर्नाटक कांदा पाच ट्रक तर महाराष्ट्र कांदा 30 ट्रक आवक झाल्याची माहिती अडत व्यापारी कल्लाप्पा गडकरी यांनी दिली.
भाजीपाला प्रतिदहा किलो
- ढबू मिरची ………….400ते 550 रु.
- इंडस ढबू मिरची..400 ते 450 रु.
- बिन्स…… 300 ते 350 रु.
- कारली…. 350 ते 400 रु.
- पांढरी काकडी 120 ते 180 रु.
- दोडकी…. 400 ते 550 रु.
- कोबी…… 200 ते 260 रु.
- इंग्लीश गाजर 380 ते 420 रु.
- भेंडी…….. 500 ते 650 रु.
- बीट…….. 240 ते 280 रु.
- जवारी काकडी 300 ते 400 रु.
- नवीन आले 180 ते 220 रु.
- जुने आले.. 250 ते 350 रु.
- मटार…… 300 ते 400 रु.
- मिरची….. 400 ते 500 रु.
- टोमॅटो प्रति टे300 ते 500 रु.
- दुधी भोपळा प्रतिडझन…………80 ते 140 रु.
- गोल भोपळा प्रतिक्विंटल…2400 ते 3000 रु
बटाटा भाव प्रतिक्विंटल
- इंदूर…….. 900 ते 1400 रु.
- आग्रा……. 800 ते 1000 रु.
- तळेगाव… 800 ते 1200 रु.
- जवारी….. 1800 ते 2200 रु.
- रताळी…. 1600 ते 2500 रु.
भाजीपाला शेकडा भाव
- मेथी…….. 200 ते 400 रु.
- शेपू……… 500 ते 600 रु.
- पालक….. 200 ते 300 रु.
- कांदापात. 300 ते 500 रु.
- लाल भाजी…………….. 300 ते 600 रु.
- घटप्रभा कोथिंबीर700 ते 800 रु.
- बेळगाव कोथिंबीर200 ते 300 रु.
महाराष्ट्र कांदा प्रतिक्विंटल
- गोळी…… 1500 ते 2000 रु.
- मीडियम.. 2000 ते 2500 रु.
- मोठवड…. 2500 ते 2800 रु.
- गोळा …….2 800 ते 3000 रु.
कर्नाटक कांदा प्रतिक्विंटल
- गोळी…… 800 ते 1600 रु.
- मीडियम.. 1600 ते 2500 रु.
- मोठवड…. 2500 ते 2600 रु.
- गोळा…… 2600 ते 3000 रु.









