बेंगळूर
वित्त क्षेत्रातील कंपनी बजाज फायनान्सने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत आपल्या निव्वळ नफ्यात 53 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. कंपनीने जुलै ते सप्टेंबर 2021 कालावधीत 1 हजार 481 कोटी रुपये एकत्रित नफा कमावला आहे. बिगर बँकिंग क्षेत्रातील बजाज फायनान्सने एकूण उत्पन्नात 19 टक्के वाढ दर्शवली आहे. 7 हजार 732 कोटी रुपये इतके उत्पन्न सप्टेंबरच्या तिमाहीत बजाजने मिळवले होते.









