मुंबई
तिमाहीतील नफ्याच्या कामागिरीमध्ये सकारात्मकता दिसल्याने बजाज फायनान्सचा समभाग शेअरबाजारात वधारताना दिसला. बजाज फायनान्सचा समभाग बीएसईवर सोमवारी इंट्रा डे दरम्यान 5 टक्के वाढत 6हजार20 रुपयांवर पोहाचला होता. शेअरबाजारात खरे तर सोमवारी घसरणीचा कल राहिला होता. बजाज कंपनीने ऑक्टोबर, डिसेंबरच्या तिसऱया तिमाहीमध्ये 2973 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला होता. वर्षाच्या आधारावर पाहता, नफ्यामध्ये 40 टक्के वाढ नोंदविली गेली.









