नवी दिल्ली
सप्टेंबर 2020 ला संपलेल्या तिमाहीत बजाज फायनान्सचा निव्वळ नफा 36 टक्क्यांनी घटला आहे. नफा घटल्याची बातमी येताच शेअर बाजारात समभाग 5 टक्के इतके खाली घसरले. सप्टेंबरअखेर कंपनीला तिमाहीत 965 कोटी रुपयांचा नफा झाला आहे जो मागच्या वर्षात समान कालावधीत 1 हजार 506 कोटी रुपये होता. दुसरीकडे कंपनीचे एकत्रित निव्वळ उत्पन्न 4 टक्के वाढून 4 हजार 165 कोटी रुपयांवर पोहचले आहे. गेले दोन दिवस शेअरबाजारात बजाज फायनान्सचे समभाग घसरण नोंदवत होते. तीच प्रक्रिया ताजे परिणाम आल्यानंतरही सुरू राहिली.









