कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या प्रभावामुळे कंपनीचा निर्णय
मुंबई
बजाज ऑटोने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार देशातील आपल्या सर्व मॉडेलच्या सर्व्हिसचा कालावधी वाढविला आहे. हा कालावधी वाढवून 31 जुलैपर्यंत केला असल्याची माहिती आहे.
बजाज ऑटोने विविध राज्यांमधील कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यामुळे सर्व्हिसचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल ते 31 मे मोफत सर्व्हिस ज्या वाहनांचे समाप्त होणार आहे, त्यांचा कालावधी हा येत्या 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सर्व दुचाकी आणि व्यावसायिक वाहनमालकांना वाढीव कालावधीत सर्व्हिस सेवेचा लाभ उठवता येणार आहे.









