मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटोने डॉमीनर 250 या मोटारसायकलीची किंमत 16 हजारांनी घटवली असल्याचे समजते. आता सदर मोटारसायकलीची किंमत 1 लाख 54 हजार 176 रुपये 9(एक्सशोरूम दिलली) इतकी असणार आहे. डॉमीनर मोटारसायकल ही 248.8 सीसी पेट्रोल इंजिनसह येणारी गाडी खास करून युवकांना समोर ठेऊन बनवण्यात आली आहे. देशभ्रमंती करणाऱया युवकांना ही गाडी नक्कीच पसंत पडणार आहे. याआधी या गाडीची किंमत 1.60 लाख रुपये इतकी (एक्सशोरूम दिल्ली) होती.









