नवी दिल्ली
वाहन कंपनी बजाज लवकरच 250 सीसी क्षमता असणारी दुचाकी लवकरच बाजारात उतरणार आहे. यात डोमिनार-250 हे मॉडेल बाजारात दाखल करण्याची शक्यता आहे. या दुचाकीची अंदाजे किंमत 1.89 लाख कोटी रुपये राहणार असल्याची माहिती आहे. यामध्ये डोमिनार-400 हे मॉडेलही राहणार असून त्याची किंमत 1.90 लाख रुपये राहण्याचे संकेत आहेत. बीएस-6 प्रणाली लागू असणाऱया मॉडेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. डोमिनार-250 चे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्ससे लॅस असणार आहे. डोमिनार-250 या मॉडेलचे डिझाइन आणि स्टाईल डोमिनारö400 सारखी असणार आहे. या दुचाकीत अप-साईट, डाऊन फ्रन्टवर फोर्क्स, रेग्युलर एलॉय व्हील, स्प्लिट सीट्स, स्प्लिट ग्रॅब आणि एलइडी टेल लॅम्पची सुविधा मिळणार असल्याचा कंपनीने दावा केला आहे.








