पीपीएफ, एनएससी, ‘सुकन्या’सह अन्य योजनांचा समावेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जानेवारी ते मार्च या तिमाहीत सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) यासह अनेक लहान बचत योजनांवरील व्याजदरामध्ये कोणतेही बदल केले नाहीत. सरकारच्या या निर्णयानंतर पीपीएफवर 7.10 टक्के आणि एनएससीवर 6.8 टक्के दराने व्याज मिळणार आहे. अर्थ मंत्रालय त्रैमासिक आधारावर अल्प-मुदत बचत योजनांवरील व्याज दराबाबत अधिसूचना जारी करते.
आर्थिक वर्ष 2020-21 च्या चौथ्या तिमाहीत विविध छोटय़ा बचत योजनांवरील व्याज दर तिसऱया तिमाहीच्या अधिसूचनेत जारी केलेल्या दराने बदल न करता ठेवण्यात आला आहे, असे वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. सरकारच्या अधिसूचनेनुसार, पंचवार्षिक ज्ये÷ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर 7.4 टक्के ठेवण्यात आला आहे. ज्ये÷ नागरिकांचा समावेश असलेल्या या योजनेवर व्याज तिमाही आधारावर दिले जाते. बचत ठेवीवरील व्याज दर वार्षिक चार टक्के ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुलींशी संबंधित सुकन्या समृद्धी योजनेच्या तिसऱया तिमाहीप्रमाणे चौथ्या तिमाहीतही 7.6 टक्के दराने व्याज दिले जाईल. तसेच किसान विकास पत्रावरील व्याज दर 6.9 टक्के कायम ठेवले आहे. त्याचवेळी, एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याज दर 5.5-6.7 टक्के दरम्यान राहील. मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्यात आल्यामुळे सरकारने अल्प मुदतीच्या बचत योजनांवरील व्याजदर सर्वसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय ठेवले आहेत.