ऑनलाईन टीम / मुंबई :
येऊ घातलेल्या गणेशोत्सवाला महाराष्ट्रात साधेपणाने साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर मुस्लिम बांधवांचा महत्वाचा असलेल्या बकरी ईदच्या सणाला साधेपणाने साजरा करण्यास परवानगी द्या, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

ते म्हणाले, येत्या 1 ऑगस्ट रोजी मुस्लीम समाजाचा सण ईद ऊल अदाह (बकरी ईद) आहे. या दिवशी मुस्लीम समाज बकऱ्यांची कुर्बानी देतो. यादिवशी कुर्बानी देण्याची सूट द्यावी असेही त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे ते म्हणाले, महाराष्ट्र राज्यात वेगवेगळे सण साजरे करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. मग बकरी ईदला का नाही? गणेशोत्सवाला जसे विविध निर्बंध लावून साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्याच पद्धतीने बकरी ईद सणालाही द्या. 1 ऑगस्ट रोजी मुस्लीम समाजाचा अतिशय महत्त्वाचा सण असलेल्या ‘ईद ऊल अदाह’च्या दिवशी कुर्बानी देण्याची सूट आणि तशी व्यवस्था सरकारने करुन द्यावी. याबाब सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. असेही त्यांनी यावेळी सांगितले.









