सरकारचे नियम पाळणे बंधनकारक : कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकांचे नमाजपठण घरीच : रमजानसाठीची विक्री ईद सणामध्य

प्रतिनिधी /बेळगाव
मुस्लीम बांधवांसाठी वर्षातील दोन महत्त्वाचे सण, एक रमजान आणि दुसरा बकरी ईद. हे दोन्ही सण मुस्लीम बांधवांसाठी खूप महत्त्वाचे आणि विशेष मानले जातात. बुधवारी बकरी ईद शहर परिसरात मोठय़ा उत्साहात आणि आनंदात साजरी केली जात आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सज्ज असली तरी व्यापाऱयांना अल्पप्रतिसाद मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ईदनिमित्त खास अत्तर, टोपी, सुरमा, मेहंदी यांची खरेदी करण्यात येते. सुका मेवा, कपडे, सुगंधी तेल, नमाज पठणाचे साहित्य, टोपी यांची खरेदी करण्यासाठी खडेबाजार परिसरात मंगळवारी गर्दी झाली होती. महिलांनीसुद्धा सौंदर्यप्रसाधने खरेदी केल्याचे यावेळी दिसून आले. गरज असलेल्याच उपयोगी साहित्याची मुस्लीम बांधवांनी यावेळी खरेदी केली.
लॉकडाऊन काळातच रमजान महिना पार पडला. यावेळी सर्व दुकाने बंद असल्याने व्यापारावर परिणाम झाला. रमजान सणासाठी मागविलेल्या साहित्याची विक्री आता ईद सणानिमित्त करत असल्याची माहिती यावेळी अत्तर आणि टोपी विपेते अबू जाईद यांनी दिली. यावषी सुक्या मेव्याची खरेदी पन्नास टक्क्मयांनी कमी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कोरोना प्रादुर्भावाचे संकट लक्षात घेऊन बकरी ईद सणासाठी आरोग्य विभागाने नियमावली घोषित केल्यामुळे मुस्लीम बांधव घरीच नमाज पठण करणार आहेत. मशिदीमध्ये फक्त पन्नास जणांनाच सामूहिक नमाज पठण करण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी सरकारचे नियम पाळणे बंधनकारक केले आहे. यावेळी सॅनिटायझर, मास्कचा वापर, सामाजिक अंतर, थर्मल स्क्रिनिंगचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवारी ईदनिमित्त बकरी मंडईत डोक्मयावर चांद असलेल्या बकऱयांवर बोली लावण्यात आली. दरवषी बकरी ईदनिमित्त होणारी लाखेंची उलाढाल यावेळी कमी प्रमाणात झाली. कोरोनामुळे विपेते आणि खरेदीदार न आल्याने बकऱयांच्या खरेदीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. यंदाही कोरोनाचे सावट असल्यामुळे बाजारात खरेदीला थंडा प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.









