एलआयसीची विशेष योजना सुरु : 9 ऑक्टोबरपर्यंत कालावधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना संकट काळात लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडून (एलआयसी) आपल्या पॉलिसीधारकांना त्यांच्याकडून पूर्वी बंद करण्यात आलेल्या पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची नव्याने संधी मिळणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात एलआयसीने विशेष रिव्हाइल मोहीम सुरु केली आहे. ही येजना येत्या 9 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. सदर योजनेत एलआयसीची बंद झालेली वैयक्तिक पॉलिसी नव्याने सुरु करण्याची संधी पॉलिसीधारकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे.
एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार प्रीमियम चुकविला जाण्याची तारीख पाच वर्षापेक्षा अधिक जुनी नसावी तसेच यात उशिराचे शुल्कात 20 टक्क्मयांपर्यंत सवलत मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पॉलिसीधारकांसाठी 30 जूनपर्यंत ऑनलाईन क्लेम सेटलमेंट प्रक्रियेत सवलत मिळणार आहे. यामुळे पॉलिसीधारक आपल्या पॉलिसीची स्कॅन कॉपी, केवायसी कागदपत्रे, डिस्चार्ज फार्मसह अन्य कागदपत्रे ईमेलच्या आधारे सर्व्हिस शाखेत पाठवून देऊ शकतात. या योजनेचा लाभ असंख्य विमाधारकांना होणार आहे. संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.