ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बांदीपोरा येथे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या तीन मदतनीसांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
इर्शाद हुसेन, आशिक हुसेन आणि मोहम्मदद अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या तीन मदतनीसांची नावे आहेत. हे तिघेही लष्कर-ए-तैयबासाठी काम करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक भागात पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. परदेशी दहशतवाद्यांना मोबाईल फोन आणि सिम कार्डसह इतर साहित्यही त्यांनी पुरवले आहे.
दरम्यान, आणखी एका घटनेत, सुरक्षा दलांनी बांदिपोरा जिल्ह्यातील बाग भागात 10 किलोचा आयईडी जप्त केला आहे. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक पाचारण आले आहे.