ऑनलाईन टीम / कोलकत्ता
बंगाल हिंदुस्थानचे रक्षण करेल आणि त्याला पाकिस्तान अथवा तालिबान होऊ देणार नाही. असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. त्या भवानीपूर पोटनिवडणुकीपूर्वी प्रचार सभेच्या निमित्ताने बोलत होत्या. यावेळी त्यांनी बिगर बंगाली समुदायाशी संवाद साधला.
त्या पश्चिम बंगाल ही रवींद्रनाथ टागोर आणि बांगलादेशचे राष्ट्रीय कवी नझरुल इस्लाम यांची भूमी आहे, इथे प्रत्येकजण एकतेने राहील, असं म्हणाल्या. भबानीपूरमध्ये ४० टक्के लोकसंख्या ही बिगर बंगाली आहे. त्यामुळे त्यांची मतं या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार आहेत.
भबानीपूर मतदारसंघ ममतांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, या भागात बिगर बंगाली समुदायातील लोकांची संख्या मोठी असल्यानं पोटनिवडणुकीत भाजप त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ममतांनी देखील आता त्यांना वळवण्यासाठी सभा घेणं सुरू केलं आहे. भाजपकडून ममतांवर त्या बंगाली आणि बिगर बंगाली लोकांमध्ये भेदभाव करत असल्याची टीका त्यांनी अनेकदा केली आहे. ही निवडणूक ३० सप्टेंबर रोजी होणार असुन भबानीपूरमतदार संघातुन ममता बॅनर्जी त्यांच्याविरोधात भाजपच्या अॅड प्रियंका टिबरीवाल या लढणार आहेत.