बंगळूर / प्रतिनिधी
गेल्या एका आठवड्यात बंगळूरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी आमदार, खासदार तसेच राज्यातील बड्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक बोलावली होती. आगामी काळात कोरोना संक्रमणाचा धोका वाढू शकतो. हे लक्षात घेऊन नवीन कोविड उपचार सेंटर उभारली जात आहेत. मात्र, कोरोना संख्या वाढत असली तरी मुख्यमंत्र्यांनी शहर लॉकडाऊन करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. ते म्हणाले की संख्या वाढत असली तरी लॉकडाऊनचा प्रश्न उद्भवत नाही.
मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यासमवेत कोरोना संक्रमणासंदर्भात झालेल्या बैठकीत राज्याचे सर्व वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. गेल्या एका आठवड्यात बंगळूर शहरातील कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या जवळपास दुप्पट झाल्यामुळे ही बैठक बोलविण्यात आली. गेल्या चार दिवसांत, कोरोना रुग्णची संख्या बाराशेच्यावर पोहचली असून काळात 11 लोक मरण पावले आहेत.
ज्या ज्या भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. या भागांची संख्याही 500 च्या आसपास पोहोचली आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी भाजप व विरोधी कॉंग्रेसचे आमदार शहरात लॉकडाऊन व्हायला हवे, असे म्हणत आहेत, पण मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी याला स्पष्टपणे नकार दिला आहे.
रुग्णांची वाढती संख्या पाहता हज हाऊस, पॅलेस ग्राऊंड, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि कुमार कृपा गेस्ट हाऊस, खासगी रुग्णालये तयार करण्याबरोबरच उपचार केंद्र बनविण्यात आले आहेत. अलीकडेच शहरातील परिस्थिती वेगाने खालावली आहे. बेड, व्हेंटिलेटर आणि रुग्णवाहिकांचा अभाव हे सरकारच्या अडचणींचे कारण आहे. या परिस्थितीला कसे सामोरे जावे याबद्दल सरकारकडे कोणतेही ठोस उत्तर नाही. एकूणच या बैठकीत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते आणि अधिकाऱ्यांशी बातचीत करून राज्यासह शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर हि परिस्थिती कशी नियंत्रणात अंत येईल यावरही अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









