ऍड. संकेत घाग यांचा युक्तिवाद, हार्डडिस्कच्या वर्णनामध्ये तफावत
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जाकादेवी बँक दरोडा खटल्यात सरकारी पक्षाकडून सीसीटीव्ही फुटेज हा अत्यंत महत्वाचा पुरावा असल्याचे सांगण्यात आले होत़े मात्र सीसीटीव्ही फुटेजसंदर्भात कायद्यातील प्रक्रियेचे पालन न करणे व विश्लेषण अहवालात असलेली विसंगती यामुळे खटल्यातील सीसीटीव्ही पुरावा विश्वासार्ह ठरत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्यावतीने ऍड़ संकेत घाग यांनी न्यायालयापुढे केल़ा
रत्नागिरी सत्र न्यायाधीश विनायक राजाराम जोशी यांच्या न्यायालयापुढे हा खटला चालवण्यात येत आह़े खटल्यात सरकारी पक्षाकडून करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर आता बचाव पक्षाकडून ऍड़ घाग यांच्याकडून न्यायालयापुढे युक्तिवाद करण्यात येत आह़े ऍड़ घाग यांनी सांगितले की, जाकादेवी बँक दरोडा खटल्यात सीसीटीव्ही फुटेजसंदर्भात भारतीय पुरावा कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींचे पालन झालेले नाह़ी त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा कायद्याने ग्राह्य धरता येणार नाह़ी फुटेजच्या पुराव्यासाठी भारतीय पुरावा कायदा कलम 65 (ब) या अन्वये जे प्रमाणपत्र देण्यात आले आहे, तेच कायद्याला अनुसरून नाह़ी तसेच बँकेत कोणी व कधी सीसीटीव्ही सिस्टिम इन्स्टॉल केली, ती कशा पद्धतीने ऑपरेट केली जात होती व त्यावर कोणाचे नियंत्रण होते, याचा काहीही पुरावा सरकार पक्ष देऊ शकला नाह़ी विश्लेषक यांच्या अहवालात ज्या हार्डडिस्कचे वर्णन देण्यात आले आहे, त्यामध्ये व बँकेच्या सीसीटीव्ही युनिटच्या इन्स्टॉलेशनचे चलन, पावत्या यामधील हार्डडिस्कच्या वर्णनात तफावत असल्याचे दिसत आह़े या संबंधी पोलिसांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाह़ी सीसीटीव्ही फुटेजच्या अहवालाचा विचार करताही 6 पैकी 4 आरोपींची ओळख चेहरेपट्टीवर निश्चित झालेली नाह़ी तसेच अन्य आवश्यक ते विश्लेषण विश्लेषकांनी केलेले नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून ऍड. संकेत घाग यांनी केल़ा
जाकादेवी सेंट्रल बँक येथे 28 नोव्हेंबर 2013 रोजी दरोडा टाकण्यात आला होत़ा यावेळी संशयित आरोपींनी बँकेतील कर्मचारी संतोष चव्हाण (ऱा धामणसे) याला गोळी घालून ठार केले होत़े तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला होत़ा तसेच संशयित आरोपी हे बँकेच्या तिजोरीतील सुमारे 6 लाख 88 हजार रुपयांची रक्कम घेऊन खासगी वाहनाने फरारी झाले, असा आरोप संशयित 6 जणांवर ठेवण्यात आला होत़ा या आरोपींमध्ये राजेंद्र राजावत (25, रा. कल्याण), हरिष गोस्वामी (25, रा. कल्याण), प्रथमेश सावंत (18, रा. जाकादेवी), शिवाजी भिसे (25, रा. कल्याण), निखिल सावंत (24, रा. डोंबिवली) आणि प्रशांत शेलार (28, रा. मुंबई) यांचा समावेश आह़े मागील 9 वर्षे चालणाऱया या खटल्याकडे संपूर्ण जिह्याचे लक्ष लागून राहिले आह़े
विश्लेषकाच्या अहवालात विसंगती
बँक व्यवस्थापक कवीश्वर यांनी सांगितल्याप्रमाणे घटनेच्या चित्रीकरणाच्या सीसीटीव्ही फुटेजवरून एक कॉपी डिव्हीडीत करण्यात आल़ी ही डिव्हीडी विश्लेषणासाठी पाठवण्यात आल़ी याउलट पोलिसांच्या केसप्रमाणे डिव्हीआर विश्लेषणासाठी पाठवण्यात आल़ा या डिव्हीआरसह 2 ब्लँक हार्डडिस्क त्यातील चित्रण कॉपी करण्यासाठी पाठवण्यात आल्या होत्य़ा मात्र पोलिसांच्या पत्रातील हार्डडिस्कचे वर्णन आणि विश्लेषक समाधान काळे यांच्या अहवालातील हार्डडिस्कचे वर्णन यामध्ये तफावत दिसून येत आह़े









