मुंबई
मोटार उद्योगात सक्रिय असलेल्या टाटा मोटर्सने बँक ऑफ इंडियासोबत हातमिळवणी केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना कर्ज उपलब्ध केले जाणार आहे. टाटा मोटर्स या हातमिळवणीतून बँक ऑफ इंडियातर्फे ग्राहकांना वाहन खरेदीसाठी अर्थपुरवठा करणार आहे. बँक ग्राहकांकरिता 6.85 टक्के इतका व्याजदर आकारणार आहे. विमा, रजिस्ट्रेशनसह वाहन किमतीच्या 90 टक्के कर्ज ग्राहकांना उपलब्ध केले जाणार आहे.









