मुंबई
उत्सवी काळाकडे लक्ष ठेऊन बँक ऑफ इंडियाने आपले घरासाठीचे तसेच वाहनांसाठीचे कर्ज स्वस्त केले आहे. बँकेने आपले व्याजदर 0.35 टक्के इतके कमी केले असल्याचे समजते. गृहकर्ज आणि वाहन कर्ज दोन्हीमध्ये कपात करत मोठा दिलासा दिला आहे. बँकेचा गृहकर्जाचा नवा व्याजदर आता 6.50 टक्के इतका असणार आहे. तर वाहन कर्जाचा दर 6.85 टक्के इतका राहणार आहे. याआधी वाहन कर्जाचा व्याजदर 7.35 टक्के इतका होता. 31 डिसेंबर 2021 पर्यंत प्रक्रिया शुल्क ग्राहकांना माफ असणार आहे.









