नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाचा सप्टेंबर 2021 रोजी तिमाहीतील नफा हा 100 टक्क्यांनी वाढून 1,051 कोटी रुपयावर पोहोचला आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार बँकेने एक वर्षा अगोदर 526 कोटी रुपयाचा निव्वळ नफा कमावला होता. बँकेच्या एका नियमावलीनुसार आर्थिक वर्ष 2021-22 मधील दुसऱया तिमाहीत निव्वळ नफा हा वर्षाच्या आधारे 99.89 टक्क्यांनी वाढून 1,051 कोटी रुपयावर राहिला आहे. मागील जून तिमाहीत 720 कोटी रुपयासह सप्टेंबर तिमाहीत बँकेचा नफा हा 45.97 टक्क्यांनी वाढला आहे. दुसऱया तिमाहीत निव्वळ व्याजातून उत्पन्न हे 3,523 कोटी रुपये राहिले आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार जून 2021 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीत 3,144 कोटी रुपये इतके उत्पन्न 12.06 टक्क्यांनी वाढले आहे.









