प्रतिनिधी / पन्हाळा
पन्हाळा पश्चिम परिसरातील बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असलेल्या व पंचवीस गाव वाडीवस्तींचे अर्थिक केंद्र स्थान म्हणून ओळख असलेल्या कोतोली येथील बँक ऑफ इंडीया शाखेमध्ये व्यवस्थापनाच्या हेळसांड कारभाराबद्दल नागरीकांच्यातून संताप व्यक्त होत आहे. तरी यामध्ये तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र निर्माण सेना यांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बँकेचे शाखाधिकारी यांच्याकडे सदरचे निवेदन देण्यात आले.
या शाखेमध्ये दररोज कोटीच्या जवळपास व्यवहार होत असतो.अनेक प्रकारची शासकीय नोकरदार, शेतकर्यांची खाती, बचत गट, विद्यार्थी अशी अनेक प्रकारची खाती या बँकेशी सलग्न असल्यामुळे लोकांची नियमीत मोठी गर्दी असते. बँक व्यवस्थापनाने दिव्यांग वयोवृद्ध तसेच महिला खातेदारांना बसण्याची पुरेशी व्यवस्था केली नसल्यामुळे लोकांना उन्हात, पावसात बँकेच्या दारात तिष्ठत बसावे लागते. दारात बसण्यासाठी पुरेशी जागा असून देखील या ठिकाणी पत्र्याचा निवारा करण्याची लोकांनी वेळोवेळी मागणी करूण देखील बँक अधिकार्याची अलिशान गाडी येथे नियमीत उभी केली जाते. तर ग्राहकांच्या मोटारसायकली वाटेत उभा केल्या जात असल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस देखील याचा नियमीत अडथळा होतो. या शाखेत नियमीत शेकडो ग्राहक येत असताना देखील मागणी करूण देखील येथे पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली नाही.
ग्राहकांनी माहीती कक्ष व वेगवेगळ्या सुविधा मिळण्यासाठी शाखाधिकारी चंद्रकांत कुंभार यांच्याकडे मागणी करूण देखील नेहमी उडउडवीची उत्तरे ऐकावी लागत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने मनसेच्या वतीने आंदोलन करून तातडीने सुधारणा करण्यासाठी निवेदन दिले आहे. अन्यथा मंगळवारी (दि.१४) शाखा अधिकार्यांना घेराव घालून शाखेला टाळे ठोकणार असल्याचा यावेळी इशारा देण्यात आला आहे.
यावेळी पन्हाळा तालुका उपाध्यक्ष अमर बचाटे,नवीन पाटील,संकेत कराळे,विशाल जाधव, तानाजी माने तसेच बँकेचे खातेदार तसेच कार्यकर्ते उपस्थित होत.









