नवी दिल्ली
देशातील पारंपारिक बँकांना टेक कंपन्या आता आव्हान निर्माण करण्याचे संकेत आहेत. कारण गुगलसारख्या टेक कंपन्या यामध्ये वेगाने आपले पाय विस्तारत असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत देशात डिपॉझिट घेणाऱया संस्थांना तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागत आहे. गुगल पे लहान भारतीय बँकांसाठी टाईम डिपॉजिट प्रोडक्ट्स आणण्याच्या तयारीत आहे.
जगभरात चर्चा
सदरच्या बाबीविषयी चर्चा जगभरात सुरु असल्याची माहिती आहे. वित्तीय संस्थांना ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे, कारण त्या आपल्या मुख्य कामावरच लक्ष्य केंद्रीत करत असतात. फिनटेक स्टार्टअप्सच्या तुलनेत अल्फाबेट, फेसबुक, इंक आणि ऍमेझॉन डॉट कॉम बँकिंगसाठी अधिक चांगली सेवा देऊ शकतात. त्यामुळे इतर बँका, वित्तसंस्थांसमोर मोठी समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण बँकांजवळ अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर व्यवसाय करण्याचा जास्त अनुभव नसतो. ग्राहकांचे नेटवर्क टेक कंपन्यांकडे आकर्षित होताना दिसते आहे.









