87 टक्के कोरोनाबाधितांमध्ये गंध अन् स्वादाची क्षमता हरवते : 4 नवी लक्षणे हंगामी फ्ल्यूपेक्षा एकदम वेगळी
हवामान बदलत असून आता हिवाळा तोंडावर आला आहे. अशा स्थितीत ऋतूकालीन ताप आणि फ्ल्यू होण्याची शक्यता वाढते. सर्वसाधारण फ्ल्यू आणि कोरोना यांच्यात मोठा फरक असला तरीही सामान्य लक्षणे एकसारखीच दिसतात. याचमुळे लोक गोंधळात आहेत आणि दोन्हीमधील फरक ओळखून घेण्यास चुकत आहेत. तज्ञांनुसार दोन्हीमध्ये काही गोष्टींद्वारे फरक केला जाऊ शकतो. तर एका अध्ययनानुसार मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे प्रौढांच्या तुलनेत वेगळीही असू शकतात.
कोरोना अन् फ्ल्यूमधील फरक
हा फरक समजून घेण्यासाठी कोरोनाच्या लक्षणांसोबत काही बदल समजून घ्यावे लागतील. कारण सर्वसाधारण फ्ल्यू आणि कोरोनाची लक्षणे जवळपास एकसारखीच आहेत. कोरोनाची बाधा झाल्यास तीव्र ताप येण्यासह सांध्यांमध्ये वेदना जाणवू लागते. तर सर्वसाधारण फ्ल्यूमध्ये केवळ अंगदुखी होते आणि तापही सौम्य असतो. कोरोनात कोरडा खोकला येतो. तर फ्ल्यूमध्ये कफसह खोकला येतो. परंतु अशक्यपणा दोन्हींमध्ये जाणवतो. कोरोनाचे सर्वात वेगळे लक्षण म्हणजे रुग्णाची गंध घेण्याची आणि चव घेण्याची क्षमता हरवते. म्हणजेच त्याला कुठल्याच गोष्टीचा गंध येत नाही तसेच काही खाल्ल्यावर चव लागणार नाही. साधारण फ्ल्यूमध्ये केवळ तोंडाची चव जाते आणि गंधक्षमतेला धक्का पोहोचत नाही.
सर्वांमध्येच लक्षण नाही
सर्व कोरोनाबाधितांची चव आणि गंध जातो असेही घडत नाही. अमेरिकेत झालेल्या एका संशोधनानुसार 87 टक्के कोरोनाबाधितांची चव आणि गंध घेण्याची क्षमता गायब होते. कोरोनाबाधितांमध्ये अनेकदा अशी लक्षणेही दिसून येतात, ही पूर्णपणे नव्या प्रकारची आहेत. यात छातीत दुखणे, ओठ नीळे पडणे यांचा समावेश आहे. याचबरोबर अनेकदा काही गोष्टींचा विसर पडू लागतो. सर्वसाधारण स्थितीत आपल्यासोबत असे कधीतरीच घडते, परंतु कोरोनात हे अनेकदा घडते.
मुलांमधील लक्षणे
5 वर्षांपर्यंतची मुले बोलू शकत नाहीत तसेच स्वतःचा अनुभव मांडू शकत नाही, याचमुळे प्रौढांप्रमाणे ते स्वतःला काय होतेय हे सांगू शकत नाहीत. याचकरता पालकांना मुलांमध्ये दिसून येत असलेली लक्षणे फ्ल्यूची आहेत का कोरोनाची यावर लक्ष द्यावे लागणार आहे. मुलांमध्ये काही नव्या प्रकारची लक्षणेही दिसून येत आहेत. मुलांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा ओठ नीळे पडल्यास त्वरित डॉक्टरकडे जाणेच योग्य आहे. याचबरोबर मुलाला ताप येत असल्यास किंवा झोपून उठल्यास काहीवेळ गोंधळात राहिल्यास किंवा योग्यप्रकारे प्रतिसाद देत नसल्यास त्याला डॉक्टरकडे नेण्यात यावे.
कोरोनानंतर काही मुलांमध्ये ‘मल्टी-सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’चीही लक्षणे दिसून येत आहेत, म्हणजेच मुलांच्या शरीरात सूज येते आणि तापही येऊ शकतो. परंतु असा प्रकार अत्यंत दुर्मीळ आहे. अशा स्थितीत त्वरित डॉक्टरचा सल्ला घेतला जावा.
लोकांनी पल्स ऑक्सीमीटर आणि रक्तातील प्राणवायूचे प्रमाण जाणून घेण्यासाठी फिंगरप्रिंट उपकरण बाळगावे. जर रीडिंग 92 पेक्षा कमी झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. असे करून स्वतःला कोरोना आणि फ्ल्यू दोन्हींपासून वाचविता येते, असे डॉक्टरांनी म्हटले
आहे
बचावासाठीची खबरदारी…
- दिवसभरात वारंवार हात धुवा
- एकमेकांपासून अंतर राखले जावे
- शक्य तितका वेळ मास्क वापरावा









