बेंगळूर
फ्लिपकार्ट होलसेलने येणाऱया सण उत्सवासाठी 12 नव्या शहरात आपल्या सेवेला प्रारंभ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येणाऱया काळात फ्लिपकार्ट आपल्या व्यवसायाचा विस्तार अधिक जोराने करणार असल्याचे स्पष्ट आहे. फ्लिपकार्ट होलसेल आता गाझियाबाद, फरीदाबाद, म्हैसूर, चंदीगड, मेरठ, आग्रा, जयपूर, ठाणे-भिवंडी-उल्हासनगर, गेटर मुंबई, वसई-मीरा-भाइंदर, ठाणे (कल्याण-डोंबिवली) येथेही सेवा देणार आहे. या शहरात फॅशन प्रकारातील उत्पादनांची सेवा देण्याचा विचार आहे.
सोबत किराणा व छोटय़ा व्यापाऱयांना डिजिटली मजबुत करण्याचा इरादा कंपनीने व्यक्त केला आहे. या वर्षाअखेर होम अँड किचन गटासह किराणा गटातही विस्तार करण्यावर भर देणार आहे.









