कंपनीच्या एमएसएमई विपेत्यांचा समावेश : सस्तोडीलसोबत विशेष करार संपन्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आता देशातील दिगग्ज ऑनलाईन व्यपारातील कंपनी फ्लिपकार्टचे एमएसएमइ विपेता भारतीय ई कॉमर्स बाजाराचा आधार घेत फ्लिपकार्ट नेपाळची अग्रणी ई कॉमर्स कंपनी सस्तोडीसोबत एक करार केलेला आहे.
सदर कराराच्या आधारे आता लाखो एमएसएमई विपेत्यांना सीमापार क्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये पार्टनरशिपमधून सस्तोडीलवर फ्लिपकार्टच्या मार्केटप्लेसच्या विपेत्याच्या मदतीने बेबी केअर ऍण्ड किड्स, ऑडिओ डिव्हाईसेस, मेन्स क्लोदिंग, विमेन्स एथनिक विअरसह स्पोर्ट्स ऍण्ड फिटनेस विअरसह अन्य श्रेणीतील उत्पादने नेपाळमधील ग्राहकांच्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
कोरोनातून सावरण्यास मदत
सध्या देशभरातील एमएसएमई पुन्हा एकदा व्यापारी क्षेत्रात तेजी प्राप्त करत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे व्यापार वाढीला मदत होणार असून याच्यातून नवीन व्यवसायाची दारे निर्माण होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ई कॉमर्स प्लॅटफार्मवर ग्राहकांचा विश्वास दिवसागणिक वाढत असल्याचे पहायवायस मिळत असल्याचे यावेळी सांगितले आहे.
देशभरातील विपेते
फ्लिपकार्ट जवळ देशभरात 2,00,000 पेक्षा अधिक विपेत उपलब्ध आहेत. यापैकी 50 टक्केपेक्षा अधिक जयपूर, लखनऊ, लुधियाना, मेरठ, सुरत, कानपूर, आग्रा, कोयबतूर आणि अहमदाबाद यासारख्या शहरामध्ये असल्याची माहिती आहे.









