2 हजारांपर्यंतच्या व्यवहारांना ओटीपीची गरज नाही
फ्लिपकार्टने सोमवारी व्हिसाद्वारा संचलित व्हिसा सेफ क्लिक (व्हीएससी) सुविधेची सुरुवात केली आहे. आता फ्लिपकार्टवर 2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांना वन टाईम पासवर्डची (ओटीपी) गरज भासणार नाही. व्हीएससी वापरकर्त्यांसाठी सोप्या आणि सुरक्षित देय प्रक्रियेसाठी भारताचा पहिला ऍप डिव्हाईस संचलित नेटवर्क समाधान तयार केला असल्याचे फ्लिपकार्टने सांगितले आहे.
ओटीपीच्या आधारे प्रमाणीत ऑनलाईन कार्ड व्यवहारामध्ये बराच वेळ लागत आहे. यामुळे ग्राहकांना व्यवहार पूर्ण करता येत नाही. परिणाणी ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, व्हीएससीमध्ये ओटीपीची कटकट राहणार नसून, व्यवहार सोपा होणार आहे, असे फ्लिपकार्टकडून सांगण्यात आले आहे. भारतात डेव्हलपर्सच्या व्हिसा टीमने ग्राहकांसाठी डिजिटल व्यवहारांमध्ये वृद्धी करण्यासाठी भारतीय ई-कॉमर्स बाजारात व्हीएससी देय प्रक्रिया सुरू केली आहे, असे व्हिसा इंडिया मॅनेजर टी आर रामचंद्रन यांनी म्हटले आहे. फ्लिपकार्ट पे लेटर आणि कार्डलेस क्रेडीटसारख्या व्यवहारांच्या खरेदीचा ग्राहकांना वेगळा अनुभव मिळेल, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.








